मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी (दि. 3) पहाटे मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. 1974मध्ये गीता मेरा नाम या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत तसेच त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या बॉलीवूडपासून दूर होत्या.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …