Breaking News

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला, नृत्य स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी माझा आवडता नेता किंवा कोरोना योद्धा यांचे चित्र काढून पाठवायचे आहे, तर नृत्य स्पर्धेसाठी देशभक्तीपर वा लोकसंगीतावर आधारित नृत्याचा व्हिडिओ (चित्रपटगीताचाही चालेल) पाठवायचा आहे. विजेत्यांना 5 ऑगस्टला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जन्मदिनी रोख बक्षीस व आकर्षक चषक दिला जाईल तसेच सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. चित्रे व नृत्याचे व्हिडिओ 9833008585, 9930258989, 9819189696 या क्रमांकांवर 2 ऑगस्टपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्याचे आवाहन आयोजक व पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply