Breaking News

राम मंदिर भूमिपूजन तयारीचा मुख्यमंत्री योगींकडून आढावा

अयोध्या : प्रतिनिधी
येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (दि. 25) अयोध्येचा दौरा केला या वेळी त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शनही घेऊन भूमिपूजनासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची उभारणी होणारे स्थळ तसेच भूमिपूजनाच्या जागेची पाहणी केली. या वेळी त्यांनी अधिकार्‍यांना काही सूचनाही केल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply