पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका (ग्रामीण) मंडल युवा मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली 1500 पत्रे पोस्टाद्वारे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानाकडे मंगळवारी (दि. 28) रवाना करण्यात आली.
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का, असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी व त्यांचे स्मरण करून देणारी 10 लाख पत्रे राज्यभरातून भाजप युवा मोर्चाकडून पवारांना पाठविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने पनवेल तालुका (ग्रामीण) मंडल युवा मोर्चातर्फे नवीन पनवेलच्या पोस्ट कार्यालय येथे पत्रे पाठविण्याचे अभियान सोशल डिस्टन्सिंग पाळून राबविण्यात आले.
या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, पनवेल तालुका (ग्रामीण) अध्यक्ष आनंद ढवळे, सरचिटणीस विश्वजीत पाटील, कोषाध्यक्ष शैलेश माळी, सदस्य दिनेश पाटील, भरत फराड, नरेश राजपूत, ओमकार पाटील, अरविंद माळी, अजय राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …