Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे स्विप 2021 अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणूक विभागातर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उत्सव स्विप 2021 अभियान राबविण्यात आले. या अभियानात उल्लेखनीय काम करणार्‍या सदस्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला.

या वेळी जाणीव एक सामाजिक संस्थाचे प्रसाद हनुमंते यांनाही गौरविण्यात आले. हा पुरस्कार पनवेल तहसीलदार विजय तळेकर, महापालिका उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त (मुख्यालय) विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, निवडणूक विभाग प्रमुख सदाशिव कवठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या अभियानाची संपूर्ण ज्यांच्यावर जबाबदारी होती असे विजय चव्हाण यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अदिती मराठे यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply