मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर बसून काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’वरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायला हवे. कोरोनामुळे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …