Breaking News

आयसीयूत दाखल महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आले होते. या वेळी रुग्णालयाच्या काही कर्मचार्‍यांनी आयसीयूतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिलेला श्वसनाचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेने रविवारी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिमोहन सिंग यांनी दिली आहे. महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानुसार पत्नीला आयसीयूत ठेवण्यात आले होते. या वेळी तिला इंजेक्शन देऊन बेशुद्द करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयातील तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply