Breaking News

पाली-मुंबई एसटी बस सेवा अचानक बंद

पाली : प्रतिनिधी

ऐन उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर पाली – मुंबई एसटी बससेवा बंद केल्याने प्रवाशी व चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ही  बससेवा पुर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांबरोबरच प्रवाशांतून जोर धरत आहे.

मोडकळीस व धोकादायक स्थितीत असलेले पाली बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे. भरीतभर म्हणून सुरु असलेल्या एसटी बसेसदेखील बंद करण्याचा सपाटा व्यवस्थापनाने लावला आहे. यापुर्वी पाली ते ठाणे कोशिंबळे ही एसटी बससेवा अचानकपणे बंद करण्यात आली होती. मात्र स्थानिक जनतेच्या मागणीनंतर ती बससेवा पुर्ववत करण्यात आली होती. सकाळी सात वाजताची पाली ते मुंबई आणि सकाळी सव्वादहा वाजताची पाली ते कल्याण बससेवा गेल्या अनेक दिवसापासून बंद करण्यात आली आहे. आता पाली ते मुंबई ही दुपारी 1 वाजताची एसटी बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना अनेक अडचणींना व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 पाली बसस्थानकातून जाणार्‍या अनेक एसटी बसेसच्या  रिजर्वेशनची सुविधा नाही. पाली ते ठाणे (सकाळी 7.30 व दुपारी 3.00), पाली ते पनवेल (दुपारी 2.30, 3.30, सायंकाळी 4.15  व 5.00) या गाड्यांच्या रिजर्वेशन सुविधा पालीमध्ये नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते नोवेल चिंचोलकर यांनी तक्रार केली आहे.

पाली -मुंबई एसटी बससेवा मुंबई डेपोतून बंद करण्यात आली आहे. तसेच लांबपल्ल्याच्या बसेसच्या रिजर्वेशन सदंर्भात पेण रामवाडी येथील विभाग नियंत्रकांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाते.
-विलास तांबट, वाहतुक नियंत्रक, पाली बसस्थानक

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply