Breaking News

रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 333 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 28) झाली असून, 333 नवे रुग्ण आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल व उरण प्रत्येकी दोन आणि खालापूर, अलिबाग, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 201, ग्रामीण 40) तालुक्यात 241, खालापूर 26, पेण 20, रोहा 18, कर्जत 11, अलिबाग आठ, उरण पाच, महाड दोन आणि सुधागड व म्हसळा प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 384 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 14539वर पोहोचला असून, मृतांची संख्या 380 इतकी झाली आहे. जिल्ह्यात 10236 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 2459 रुग्ण सक्रिय आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply