नवी मुंबई : प्रतिनिधी – वृक्ष ही सजीवांच्या जीवनासाठी अनमोल आहेत. परंतु सिमेंटची जंगले उभी राहत असताना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. भावी पिढीकडून वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये. न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोलीमधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
घणसोली सेक्टर 9 मधील न्यू बॉम्बे सिटी स्कूलमध्ये भारतीय परंपरा व देशहीत जपणारे सण, उत्सव दरवर्षी नियमित साजरे केले जातात. या वर्षी ऑनलाइन वर्ग भरत असले तरी आषाढी एकादशी, नागपंचमी व गुरू पौर्णिमा व आता रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरे केले. यासाठी माध्यमिकचे मुख्याध्यापक विठ्ठल लामखडे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कविता पवार भोसले, अध्यापिका शीतल शिंदे, रेखा पाटील, मनिषा भागवत, कल्पना केसरकर, चैत्राली एकबोटे, मंगल एवले, नम्रता जालकोटकर यांनी विद्यार्थीना प्रोत्साहित केले.