पनवेल : बातमीदार – अस्थिव्यंग असून देखील बेलवली येथील टीना दत्तात्रेय ढवळे या विद्यार्थिनीने दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळवत 84.60 टक्के गुण मिळवले आहेत. दहावी नंतर पुढे सायन्समध्ये प्रवेश घेणार असल्याचे टिनाने सांगितले.
टीना ढवळे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील दत्तात्रेय ढवळे हे एका कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतात. टीना जन्मापासुनच पायाने अपंग आहे. तीला एकच पाय आहे. 11वीला सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा असल्याचे तीने सांगितले. तीला शिक्षण, खेळ, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन यामध्ये विविध बक्षिसे मिळाली आहेत. टीनाला चित्रकला आणि रांगोळी काढण्याचा छंद आहे. या यशा बद्दल टिनाने शाळा, मुख्याध्यापक, यांचे आभार मानले आहेत.
समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमातंर्गत पनवेल गटातून सर्व सामान्य शाळेत शिक्षण घेत असलेले दिव्यांग विद्यार्थ्यानी या 2019-20 या शैक्षणिक वर्षात सामान्य विषयातून तर काहींनी ऐच्छिक विषयातून त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या अध्ययन शैलीनुसार या बालकांनी एसएससी परीक्षेत भरघोस यश मिळवले आहे. पनवेल गटाचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनातून हे शक्य झाले आहे. त्यांनी दिव्यांग विद्यार्थांना पाठींबा दिला आणि त्यांना मार्गदर्शन केले.