पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात बुधवारी तब्बत 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 426 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच 398 रुग्ण बरे झाले आहेत.
मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पेण चार, पनवेल तीन, उरण तीन, अलिबाग दोन, मुरुड दोन, तसेच खालापूर, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तर आढळलेल्या रुग्णांत पनवेल मनपा 177, पनवेल ग्रामीण 44, पेण 76, रोहा 38, अलिबाग 28, खालापूर 23, उरण 10, माणगाव 10, कर्जत नऊ, सुधागड तीन, महाड तीन, मुरुड दोन, तळा दोन, पोलादपूर एक रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल तालुक्यात 221 नवे कोरोनाग्रस्त;
तीन जणांचा मृत्यू; 208 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.5) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 208 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 177 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 178 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 44 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 30 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापैकी पनवेल तक्का साई आंगण, खांदा कॉलनी सेक्टर 6 आंबिका पार्क, कामोठे सेक्टर 9 मोरेश्वर कॉम्प्लेक्स येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1339 झाली आहे. कामोठेमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1519 झाली आहे. खारघरमध्ये 35 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1414 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1281 झाली आहे. पनवेलमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1357 झाली आहे. तळोजामध्ये सहा नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 442 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 7352 रुग्ण झाले असून 5820 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.16 टक्के आहे. 1357 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 175 जणांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 23381 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत.
उरण तालुक्यात 10 जणांना लागण;
तीन रुग्णांचा मृत्यू; 32 जणांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात बुधवारी (दि.5) कोरोना पॉझिटीव्ह 10 नवे रुग्ण आढळले, तीन रुग्णांचा मृत्यु व 32 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आढळेलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी तीन, केगाव अवेडा, रांजणपाडा जासई, नवीन शेवा, विंधणे, आवरे, पागोटे, दादरपाडा शाळेजवळ दिघोडे उरण येथे प्रत्येकी एक असे एकूण 10 रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये उरण आठ, नवघर दोन, केगाव दोन, डोंगरी दोन, चीर्ले, दिघोडे, पिरकोन, नवीन शेवा, जासई रेल्वे कॉलनी, मोरा उरण कोळीवाडा, जेएनपीटी उरण, ग्रीन पार्क अपार्टमेंट तांडेलवाडी करंजा, द्रोणागिरी, विंधणे, सावरखार, जासई, सोनारी, बोकडवीरा,
फुंडे, नागाव, मुळेखंड येथे प्रत्येकी एक असे एकूण 32 रुग्णांचा समावेश आहे. तर पाणजे, मोरा सिंडीकेट बँक जवळ व जासई येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन मृत्यु
झाले आहेत. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 935 झाली आहे. त्यातील 749 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 152 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 34 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.