Breaking News

पनवेल मनपाची सिडकोसोबत बैठक

नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील सिडको विभागाच्या नागरी समस्यांबाबत शुक्रवारी (दि. 12) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेलापूर येथील सिडको भवनात व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. या वेळी विविध समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली.
या बैठकीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समितीचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सिडकोशी निगडित ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या वेळी लोकप्रतिनिधींकडून सिडकोच्या अधिकार्‍यांकडे करण्यात आली.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply