Breaking News

देशाच्या आरोग्यव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव तरतूदीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारमध्ये आपली भूमिका मांडली, तसेच देशाच्या आरोग्यव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन केलेली चतु:सूत्रीदेखील सांगितली.
भारताचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही चार मुख्य गोष्टींवर काम करीत आहोत. यामध्ये रोगप्रतिबंध आणि आरोग्याचा प्रसार, सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, आरोग्य सुविधांसाठीची व्यवस्था तयार करणे आणि आरोग्य क्षेत्रासाठी अधिक प्रमाणात आणि दर्जेदार मनुष्यबळ तयार करणे यांचा समावेश असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या वेळी पंतप्रधानांनी ‘आपण मोठ्या प्रमाणावर वाढणार्‍या स्वदेशी लशीच्या मागणीसाठी तयार राहायला हवे’, असेही सांगितले. ‘आज भारताच्या आरोग्य यंत्रणेवरचा जगाचा विश्वास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या लशींची मागणी वाढू शकते, त्यासाठी आपण तयार राहायला हवे’, असे त्यांनी सांगितले.
2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी तब्बल दोन लाख 23 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही दशकांमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेली ही सर्वाधिक तरतूद ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद तब्बल 137 टक्क्यांनी जास्त आहे. यापैकी 35 हजार कोटी रुपये हे कोरोना लशीसाठी खर्च केले जाणार आहेत.
2025पर्यंत टीबीला हद्दपार करायचेय!
येत्या चार वर्षांत टीबीला देशातून हद्दपार करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी या वेळी बोलून दाखवला. कोविड-19ने आपल्याला अशाच प्रकारच्या इतर आजारांशीही लढा देण्याचा धडा शिकवला आहे. आता 2025पर्यंत टीबीला देशातून हद्दपार करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. यासाठीदेखील मास्क घालणे, लवकर निदान होणे आणि उपचारांची सुरुवात करणे आवश्यक आहे’, असे ते म्हणाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply