Breaking News

आदिवासी बांधवांना मदतीचा हात

रेवदंडा ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासीवाडी सामाजिक कार्य म्हणून दत्तक घेतलेल्या ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेच्या वतीने येथील आदिवासी बांधवांना गॅस शेगडी व खानाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम खानाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी भूषविले. या वेळी ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. साजिद सय्यद यांसह कामगार नेते अनंता गोंधळी, सरपंच अनिता गोंधळी, सदस्य जितेन गोंधळी, विजय शिंदे, योगेश थळे, अविनाश म्हात्रे, जयवंत कर्णेकर, रेवदंडा पोलीस ठाणे अंमलदार व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अध्यक्षीय भाषणात संस्था दीनदुबळ्यांसाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून संस्थेच्या वतीने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply