Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

भाईंदर : प्रतिनिधी
भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यावर हा प्रकार समोर आला. या तरुणीला तिचा पती घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेच्या आईने आरोपी बाऊन्सरविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संबंधित बाऊन्सरला अटक केली असून, त्याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मोठ्या बहिणीची प्रसुतीदरम्यान प्रकृती खालावल्याने 26 मे रोजी दगावली होती. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात जणांना भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. पीडित महिला आणि तिची भाची कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या दोघींना त्याच सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
पीडितेने सांगितले की, 2 जून रोजी रात्री 10 वाजता आरोपीने दरवाजा ठोठावला. मुलीला दूध आणि गरम पाणी देण्याच्या बहाण्याने तो आला होता. आत आल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी केली. त्यानंतर याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सलग दोन दिवस त्याने माझ्यावर बलात्कार केला.
माझी मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने याबाबत पतीला सांगितले. आता तिचा पती घटस्फोट घेण्याचा विचार करीत आहे, असे पीडितेच्या आईने सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply