उरण : वार्ताहर
शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नसल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाची उरण भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 7) होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी उरण भाजप कार्यालयासमोर आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष जसीन गॅस, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीळकंठ घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, उपाध्यक्ष भूपेन घरत, चिटणीस समीर मढवी, मुकुंद गावंड, महालण विभागीय अध्यक्ष महेश कडू, प्रमोद म्हात्रे, प्रसाद पाटील, दिनेश तांडेल, नवीन शेवा सरपंच निशांत घरत, मिलिंद पाटील, गणेश घरत, सागर मोहिते, रोहित पाटील, नितीन पाटील, रोहित भोईर, हितेन शाह, मनोहर सहतीया, ब्लेस कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, देशातील सर्वोच्च घटनापीठाने संमत केलेल्या कृषी कायद्याला महाराष्ट्र सरकार स्वीकारत नाहीये. राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी आहे. वास्तविक शेतकर्याला स्वत:चा शेतमाल कुठेही विकता यावा आणि त्याला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक सादर केले व त्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला आहे, पण महाराष्ट्रात तो लागू केला जात नाही. त्यामुळे ठाकरे सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
Check Also
पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा
२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
RamPrahar – The Panvel Daily Paper