Breaking News

नववर्षात इस्रो घेणार भरारी!

गगनयान, चांद्रयान-3साठी केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नव्या वर्षात गगनयान आणि चांद्रयान-3 अवकाशात सोडणार आहे. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत बोलताना बुधवारी (दि. 1) देशवासीयांना ही आनंदाची बातमी दिली. या वेळी त्यांनी इस्रोची पुढील मोहीम व योजनांची माहिती दिली.
चांद्रयान-3 मोहिमेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचे सांगून गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचे के. सिवन यांनी सांगितले. अवकाश विज्ञानाच्या साहाय्याने आम्ही देशवासीयांचे जीवनमान अजून चांगले करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
2020मध्ये आम्ही चांद्रयान-3 सहक्षेपित करणार आहोत, तर गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचे गठन करण्यात आले आहे, अशी माहिती सिवन यांनी दिली.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply