कर्जत, पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर
रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पनवेल तालुक्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) घडली. नागोठणे येथेही एकाचा मृत्यू झालेला आहे.
कर्जत तालुक्यात गुरुवारी (दि. 22) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी पाटगाव तागवाडी येथे घरात बसलेल्या कीर्ती मेंगाळ (वय 20) या विवाहितेच्या अंगावर वीज पडून त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या मांडीवर झोपलेल्या चार महिन्यांच्या बाळाला कोणतीही इजा झालेली नाही.
दुसरी घटना पनवेल तालुक्यातील खारघर वसाहतीत घडला. तेथील सेक्टर 12 येथे राहणारा सागर विश्वकर्मा (वय 21) हा गुरुवारी सायंकाळी सोसायटीच्या गच्चीवर कॉफी पित होता. त्या वेळी अचानकपणे वीज अंगावर पडून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.