पनवेल : बातमीदार
प्रजापिता ब्रह्माकुमारीज पनवेलकडून रविवारी (दि. 15) पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकातील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या प्रमुख राजयोगिनी बीके संतोष, पनवेलच्या प्रमुख बीके तारा, महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. शुभदा नील, डॉ. संजीवनी गुणे, नगरसेविका राजश्री वावेकर, लायन्स क्लबच्या अध्यक्षा निशा शर्मा, सायनच्या बीके माला, वाशीच्या बीके शीला, अलिबागच्या बीके भारती, रोह्याच्या बीके मंदा, सीबीडी-बेलापूरच्या बीके शुभांगी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संतोष आणि तारा यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगून पूर्वीचा सुजलाम आणि सुफलाम हिंदुस्थान आपल्याला बनवायचा आहे असे सांगून वृक्ष लावा, पर्यावरण जोपासा असे आवाहन केले. पनवेलच्या महापौर कविता चौतमाल यांनी दोन वर्षांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार तीन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करून आपण त्यांची वाढ करू या, असे सांगितले. यानंतर उपस्थित ब्रह्माकुमारीज परिवाराकडून वृक्षारोपण करण्यात येऊन हे सर्व वृक्ष वाढवू, असे अभिवचन सर्वांनी दिले.