कुंथत कुंथत सरकार चालत नाही; राज ठाकरेंचे राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईत अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही, पण आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे. ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी (दि. 29) त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, असे म्हणत टोला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढील वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीज बिल कमी करण्यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा राज यांनी भेटीनंतर व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश अडकले आहेत, रेल्वे सुरू होत नाही, महिलांचे प्रश्न आहेत, कशासाठी सरकार कुंथतंय हे समजत नाही. कुंथत कुंथत सरकार चालत नाही. रस्त्यात वाहतूक कोंडी आहे. रेस्तराँ सुरू झालेत, पण मंदिरे उघडली नाहीत. केवळ धरसोडपणा सुरू आहे. सरकारने नीट विचार करून लोकांना एकदाच काय ते स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. गेली अनेक महिने अनेकांचे रोजगार गेले आहेत. असे विषय असताना अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आहेत. लोक कुठून बिले भरणार. लोकांच्या भावना लक्षात घेता सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply