Breaking News

सिडकोतर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या 10 गावांतील बांधकामांबाबतच्या तक्रारींचे प्राधान्यक्रमाने निवारण करण्यासाठी सिडकोतर्फे निवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. उलवे, कोंबडभुजे, तरघर आणि अन्य गावांतील चलतचित्रण करण्यात आलेली  बांधकामे, कुलदेवतांची मंदिरे व खासगी मंदिरे यांविषयीच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सिडकोतर्फे ही त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सुबोधकुमार यांच्या व्यतिरिक्त सिडकोचे अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापन अधिकारी आणि सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख हे दोन सदस्य असतील, तसेच प्रकल्पबाधित समितीतील प्रतिनिधी व संबंधित गावांतील प्रतिनिधींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश करण्यात येईल.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply