Breaking News

कर्जतमध्ये 52 जणांचे रक्तदान

कर्जत : प्रतिनिधी

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड कर्जत यांच्या संयुक्तवतीने घाटकोपर समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने येथील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रविवारी (दि. 22) आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 52  जणांनी रक्तदान केले.

श्री रामजन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून रविवारी सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतमधील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. कुलाबा जिल्हा मंत्री रमेश मोगरे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कौस्तुभ करमरकर यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. शिबिरात 52  जणांनी रक्तदान केले. समर्पण रक्तपेढीच्या डॉ. पल्लवी जाधव, प्रकाश आयवळे, स्नेहल कांबळे, अमित मोरे, राजश्री कवळे, श्रीराम नाईक, सुनील निळे, प्रदीप लोंढे, प्रमोद पवार, विकास जाधव, अभिषेक मोर्या यांनी रक्तसंकलनाचे काम केले.

डॉ. संजीवकुमार पाटील, सतीश श्रीखंडे, कुणाल पाटील, डॉ. संगीता दळवी, डॉ. जयश्री म्हात्रे, राहुल कुलकर्णी, सुहास बडेकर यांच्यासह कोव्हिड वार्ड कर्मचार्‍यांचा यावेळी कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बजरंग दलाचे कोकण प्रांत संयोजक संदीप भगत, नगरसेवक बळवंत घुमरे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, राहुल वैद्य यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी तालुका संघचालक विनायक चितळे, बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे, कर्जत प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड संयोजक कमलाकर किरडे, अनंता हजारे, सचिन ठाकूर, तेजस दाभणे, महेश बडेकर, केदार भडगावकर, रमेश नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply