कोरोनाचे चार संशयित रुग्ण आढळल्याने खबरदारी
मुंबई : प्रतिनिधी
करोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या चार संशयितांपैकी एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही. यातील एक ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करीत होता, इतर तिघे स्थानिक ठिकाणी काम करतात. त्यामुळे त्यांना नेमकी कशी लागण झाली याची माहिती घेतली जात आहे.
मुंबईत आणखी एक जणाचा मृत्यू
कोरोनामुळे मुंबईत आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे. फोर्टिस रुग्णालयात दाखल असलेल्या 80 वर्षीय व्यक्तिचा शनिवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट समोर आले असता, कोरोनाची लागण झाली होती, हे निष्पन्न झाले.