महाड ः प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा महाड येथील शिवसैनिकांनीच निषेध केला आहे.
‘मी तानाजी मालुसरेसारखा धारातिर्थी पडणारा सैनिक नाही,’ असे बेताल विधान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्याचा महाड आंबेशिवथर येथील शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला आहे.
या वेळी आंबेशिवथर गावचे माजी पोलीस पाटील भगवान मालुसरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठल मालुसरे, गोविंद चौधरी, माजी सरपंच अविनाश मालुसरे, अरविंद मालुसरे, ठकसेन मालुसरे, सुसेश मालुसरे, कैलास मालुसरे, बाळा मालुसरे, सुरेश गेणू मालुसरे, सुरेश भागोजी मालुसरे, चंद्रकांत गायकवाड, दगडू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …