पनवेल : रामप्रहर वृत्त – महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकर्यांच्या सोईकरिता सर्व योजनांचा लाभ अर्ज एक योजना अनेक या एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संघनिय प्रणाली कृषी विभागाने विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्यांना त्याच्या पसंतीच्या निवडीचे स्वतंत्र देण्यात आले असून शेतकर्यांनी विविध बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन उरण कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
शेतकर्यांसाठी कृषी विभागामार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. शेतकरी एकाच अर्जाद्वारे ह्या योजनाचा लाभ महाडीबीटी या पोर्टलवर घेऊ शकतो. यासाठी शेतकर्यांनी आपला वयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी चरहरवलीांरहरळीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जाऊन ’शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून स्वतःचा मोबाइल संगणक टब्लेट इ सेवा केंद्र आदी माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन शेतकर्यांनी अर्ज करायचा आहे.’वैयक्तीक लाभार्थी’म्हणून नोंदणी करू इच्छिणार्या सर्व शेतकर्यांना त्याचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.
परंतु ज्या शेतकर्यांकडे आधार कार्ड क्रमांक नसेल अशा शेतकर्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन आपला आधार नोंदणी करून तो आधार नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलवर नमूद करून या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अर्जदाराने अनुदात वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये शेतकर्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून ह्यावा लागणार आहे. त्या शिवाय शेतकर्यांना त्याने अनुदान वितरण करता येणार नाही.
पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी पूर्व संमती देणे मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सर्व प्रक्रिया आनलाइन केल्या जाणार आहेत. ज्या लाभार्थ्यांनी, ऑनलाइन अर्ज भरलेला असेल आणि ज्या शेतकर्यांना काही बदल करायचे असतील ते बदल करू शकतात. ज्या शेतकर्यांनी अर्ज केलेला नसेल अशाच अर्जदाराने 31 डिसेंबर 2020 पूर्वी डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचे आहेत अशाच अर्जदारांना ग्राह्य धरले जाईल. या योजनेसाठी शेतकर्यांना उरण तालुका कृषी खात्याकडून अर्ज भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.