Breaking News

इंग्लंडहून रायगडात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

अलिबाग : इंग्लडहून रायगड जिल्ह्यातील खारघरमध्ये आलेली   महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 जणांची कोविड तपासणी सुरू आहे.  
इंग्लडहून खारघर येथील एक दाम्पत्य 8 डिसेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर दोघे खोपोलीत आले. परदेशातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्य शासनाने आरोग्य विभागाला दिले होते. इंग्लंडवरून आलेल्या जोडप्याची माहिती खोपोली नगर परिषद आरोग्य विभागाने 24 डिसेंबर रोजी मिळाली. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी पती आणि पत्नीची कोविड तपासणी करण्यात आली. मंगळवारी (दि. 29) दोघांचा रिपार्ट प्राप्त झाला. यात  पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.
परदेशात सध्या कोरोनाची दुसरी नवी लाट आली आहे, तर इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भारतातही परदेशातून येणार्‍या प्रवाशांद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांची कोविड तपासणी केली जात आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply