पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वच्छ व सुंदर गावासाठी सातत्याने काम करणार्या सरपंच माधुरी पाटील यांच्या प्रयत्नातून कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल झाली आहे. या वाहनाचे लोकार्पण सरपंच माधुरी पाटील यांच्या हस्ते झाले.
15 व्या वित्त आयोग निधीतून ही घंटागाडी उपलब्ध झाली असून या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यास उपसरपंच रंजना राम नाईक, माजी प्रभारी उपसरपंच अनिल पाटील, सदस्य महेंद्र गोजे, रोहित घरत, अजित पाटील, राजश्री रवींद्र घरत, रेवणाथ पाटील, मोनिका महादेव पाटील, निवेदिता नितीन लबडे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राम गोजे, माजी सरपंच जयवंत पाटील, अनिल काठावले, आदिवासी सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर महाराज, हा. भ. प. संभाजी महाराज आणि व कसलखंड, अरीवली, आष्टे, शिवाजी नगर येथील वारकरी मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीमधील विकासासाठी सरपंच म्हणून माधुरी पाटील यांनी राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला देत आहेत. तसेच गावाच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने आणखी एक विकासकामाची भर त्यामध्ये पडली आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याने ग्रामस्थांनी माधुरी पाटील आणि सहकार्यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.
भारत स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यामुळे या घंटागाडी वाहनाचा उपयोग स्वच्छतेच्या संदर्भात चांगल्याप्रमाणे होणार आहे. ग्रामपंचायतीमधील गावाचा विकास हाच उद्देश घेऊन सरपंच माधुरी पाटील व सहकारी काम करीत आहेत. केलेली विकासकामे लपत नसतात, त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आम्हीही आमच्या गावात विकासकामे करू.
-दीपक जुमारे