Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 29) झाली.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या या सभेला मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, खजिनदार भाऊशेठ पाटील, हरिश्चंद्र पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, संजय भगत, वसंत पाटील, डॉ. एस. टी. गडदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply