पेण ः प्रतिनिधी – पेण उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल अधिकारी-कर्मचार्यांसाठी रक्तदान शिबिर आणि अँटीजन टेस्ट करण्यात आली. रक्तदान शिबिरात 28 जणांनी रक्तदान केले, तर उपस्थितांपैकी 74 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
रोहा येथील नायब तहसीलदार नागावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. या वेळी डॉ. नागावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली. रक्तदान शिबिरास उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, शशिकांत वाघमारे, सुनील जाधव, धनंजय कांबळे, श्रीकृष्ण ठाकूर, सर्व नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल, शिपाई, क्लार्क यांच्यासह सर्व अधिकारी तसेच एमजे हॉस्पिटलचे डॉक्टर, पेण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.