उरण : वार्ताहर
पेण हद्दीतील आदिवासी समाजाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली. अशा नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, असे निवेदन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 यांनी बुधवारी (दि.6) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना दिले. निवेदनात असे नमूद केले आहे की, पेण हददीतील आदिवासी समाजाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हे कृत्य संपूर्ण समाजाला काळीमा फासणारे असून त्या निच व्यक्तीवर भा. दं. वि. कलम 376, भारत सरकार अॅस्टोसिटीअॅक्ट 1989 अंतर्गत कडक कारवाई आणि पिडीत बालिका 12 वर्षा खालील असल्यामुळे पोस्को कायदा 2012 अंतर्गत फाशीच्या शिक्षेची कारवाई करावी. निवेदन देताना समितीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, सुनील जाधव, चिटणीस विजय पवार, सहचिटणीस रोशन गाडे, खजिनदार अंनत जाधव, सहखजिनदार सुरेश गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल कासारे व कार्यकर्ते उपस्थित होते.