Breaking News

शिक्षकांचा सत्कार; क्रांतिज्योती महिला विकास फाऊंडेशनचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर

क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून पनवेलमधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गाची फाऊंडेशनच्या सदस्यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगतामध्ये क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच या सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विसपुते महिला वसतीगृह, नवीन पनवेल याठिकाणी पनवेलमधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी विसपुते कॉलेज व आदर्श शैक्षणिक समूहचे चेअरमन धनराज विसपूते, उद्योजक सतिश मोरे, माजी महापौर सौ. चारुशीला घरत, अ‍ॅड. संगीता रोकडे, अ‍ॅड दीपाली बांद्रे, माजी नगरसेविका नीता माळी, डी. डी. विसपुते प्राध्यापिकासीमा कांबळे, प्राध्यापिका इंदुमती ठक्कर, मुख्याध्यापक एम. यु. एम. इंटरनॅशनल स्कुल चंद्रकांत सूर्यवंशी, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, उद्योग नगरी वृत्तपत्राचे पत्रकार रुपाली वाघमारे, दैनिक हिंदू सम्राट वृत्तपेपरचे पत्रकार वीरेंद्र म्हात्रे, जागरूक महाराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार एकनाथ गोपाळ, जयश्रीमाई सावार्डेकर, भारतीय महाक्रांन्ती सेना राष्ट्रीय अथ्यक्ष महिला आघाडी, समाजसेविका वंदना बामणे, सह शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते. तसेच क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा रुपाली शिंदे व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रुपाली शिंदे, सदस्या मौसमी तटकरे, विचुंबे विभागीय अध्यक्षा रत्नमाला पाबरेकर, सदस्या यामिनी महाजन, सदस्या माणिनी घोडके व डी.डी. विसपुते कॉलेजचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply