Breaking News

धोनीचा विक्रम मोडण्यासाठी पंतला फक्त एका धावेची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चौथ्या व अंतिम कसोटीतील पहिल्या डावात ऋषभ पंतने 23 धावांची छोटेखानी खेळी केली. यासह आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत पंतच्या नावावर 999 धावा झाल्या आहेत. कसोटीमध्ये एक हजार धावा करण्यासाठी एका धावेची गरज असतानाच तो बाद झाला. त्यामुळे धोनीच्या नावावरील विक्रम मोडण्यासाठी त्याला आता आणखी एका धावेची गरज आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेगवान एक हजार धावा करणार्‍या यष्टीरक्षकाचा विक्रम माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहे. धोनीने कसोटीमध्ये 32 डावांत एक हजार धावा केल्या आहेत. त्याने माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर यांचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख यांनी 36 डावांत एक हजार धावा केल्या होत्या. ब्रिस्बेनमध्ये 23 धावांवर बाद होणार्‍या पंतने 26 डावांत 999 धावा चोपल्या आहेत. एक हजार कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी पंतला फक्त एका धावेची गरज आहे. पुढील डावात एक धाव काढल्यानंतर पंत धोनीचा विक्रम मोडीत काढू शकतो. दरम्यान, पंत 23 धावांवर बाद झाल्यामुळे लागोपाठ 11 डावांत 25पेक्षा जास्त धावा करण्यापासून वंचित राहिला आहे. पंतने ऑस्ट्रेलियात लागोपाठ 10 डावांत 25 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply