Breaking News

वांद्रे, चुनाभट्टी येथील गोविंदा पथके ठरली

साईतेज प्रतिष्ठानच्या आमदार चषकाचे मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल पोदी येथील साईतेज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात पुरुषांमध्ये मुंबईतील वांद्रे येथील संगम गोविंदा पथकाने आणि महिलांमध्ये मुंबईच्याच चुनाभट्टी येथील मार्लेश्वर गोविंदा पथकाने मानाचा आमदार चषक पटकाविला. या पथकांना सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरविण्यात आले.

पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी आयोजिलेल्या या दहीहंडी उत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि गोविंदा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी या दहीहंडी उत्सवात सिनेअभिनेता अंकुश चौधरी आकर्षण ठरला, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनीही उपस्थिती दर्शविली होती.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply