खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजच्या जवळपास रविवारी (दि. 17) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे. किमी 46 पुणे मार्गिकेवर अचानक लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. चालक व त्याच्या सहकार्याने प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने दोघांचे जीव वाचले.
आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने या वेळी तातडीने उपाय केल्याने जीवितहानी झाली नाही. तसेच इतर वाहनांना होणारा धोकाही टळला.