Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकांचा आज लागणार निकाल

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मतदान झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 18) होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. त्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे. कोरोनामुळे मतमोजणी ठिकाणी जाण्यास कलम 144 अन्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया झाली. एकूण 78.80 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळाली. या माध्यमातून विविध पक्षांचे 1588 उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. त्याचा फैसला सोमवारी होणार आहे. यासाठी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनाने तयारी केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply