हवाप्रदूषण समस्येबाबत केल्या सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे शनिवारी अनावरण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी खारघर-तळोजा येथील वाढत्या प्रदुषणाच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या.
या वेळी नगरसेवक अभिमन्यु पाटील, रामजी बेरा, निलेश बाविस्कर, प्रवीण पाटील, हरेश केणी तसेच भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम, किर्ती नवघरे यांच्यासह वातावरण फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक भगवान केसभाट व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, खारघर-तळोजा येथील वाढते हवा प्रदुषण लक्षात घेता स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिधींनी याबाबत भूमिका घ्यावी. महापालिकेत ही समस्या मांडली पाहिजे. तसेच यासंदर्भात निर्माण होणार्या समस्या व त्यावरील उपयायोजना याचा अभ्यास करून महापालिकेत आवाज उठवला पाहिजे. यासाठी मी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत ही समस्या मांडणार आहे.