Breaking News

उद्याने, खेळाच्या मैदानांची परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ आणि ‘ड’ मधील सिडकोने हस्तांतरीत केलेले उद्याने तसेच इतर उद्याने आणि खेळाच्या मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) पाहणी केली. या उद्यानांमध्ये सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार असून, या पार्श्वभुमीवर या पाहणी दौर्‍याचे आयोजन केले होते.

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ब’ आणि ‘ड’ मधील अनेक उद्याने ही सिडकोने महापलिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. तसेच या हस्तांतरीत केले. या उद्यानांनी तसेच इतर उद्यांनमध्ये सुशीभकरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पदाधिकार्‍यांसह या उद्यांनाची पाहणी केली.

या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘ब’ सभापती समीर ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, बबन मुकादम, अमर पाटील, नगरसेविका राजेश्री वावेकर, जगदीश घरत, शशिकांत शेळके, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कमल कोठारी आदी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply