पनवेल : रामप्रहर वृत्त
तरुणीवर केलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे गरजेचे असताना अद्याप त्यांनी तो दिलेला नाही, तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले आहे. याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला असून, याबाबत सोमवारी (दि. 18) राज्यभर आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील व पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठ्यात निदर्शने करण्यात आली. कामोठे येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय व भाजप कार्यालय येथे झालेल्या या निदर्शनावेळी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग ‘ड’ सभापती सुशीला घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, हेमलता म्हात्रे, पनवेल शहर मंडल अध्यक्ष वर्षा नाईक, कामोठे अध्यक्ष वनिता पाटील, खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे, माजी नगरसेविका नीता माळी तसेच सपना पाटील, सुहासिनी केकाणे, आदिती मराठे, स्नेहल खरे, मयुरी उन्नटकर, वैद्यकीय सेल पनवेल संयोजक ज्योती देशमाने, विजय वर्तक, महिला मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस जयश्री धापटे, ललिता इनकर, वैशाली घोलप, सुनीता शर्मा, वनिता महादेव पाटील, सुरेखा लांडे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांनी हातात फलक घेऊन व घोषणाबाजी करून धनंजय मुंडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.