म्हणतो, खूप आनंद साजरा करू नका! आमच्यापासून सावध राहा!!
लंडन : वृत्तसंस्था
भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1च्या फरकाने पराभूत करीत ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्यात देदीप्यमान कामगिरी करणार्या टीम इंडियासाठी पुढचे आव्हान तयार आहे. 5 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच इंग्लंडच्या माजी खेळाडूने भारतीय संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने खास हिंदीतून ट्विट करीत भारतीय संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑस्ट्रेलियात केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संघाबरोबरच संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येक भारतीयाला टीम इंडियाच्या या कामगिरीवर अभिमान वाटत आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशनही करीत आहे, मात्र यात इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. ‘जीत का जश्न जरूर मनाऐ, लेकिन हमसे सावधान रहे’ असे पीटरसनने हिंदीतून ट्विट केले आहे.
पीटरसनने म्हटलेय…
भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणींवर मात करून मिळाला आहे, पण खरा संघ काही आठवड्यांनंतर येत आहे. त्याला तुमच्या घरात पराभूत करावे लागेल. सतर्क राहा. दोन आठवड्यांत जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा. पीटरसन याने ट्विटच्या शेवटी हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहे. एकप्रकारे पीटरसनने हसत-हसत इंग्लंडला हरवण्याचे आव्हान दिले आहे.