Breaking News

पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

मोरू नारायण म्हात्रे विद्यालय

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यात कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, जिल्हा परिषदेची मराठी शाळा तसेच गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहण झाले. या वेळी उपस्थितांनी तिरंग्याला सलामी दिली. देशावर कोरोनाचे संकट असले तरी देशवासियांत मात्र उत्साह कायम आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात ध्वजारोहण केले. तर मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात कामगार नेते महेंद्र घरत यांनी, जिल्हा परिषदेची मराठी शाळेत अनंता ठाकूर यांनी ध्वजारोहण केले. गव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात रघूशेठ घरत तर गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच हेमलता भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. परिसरात विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, उलवा नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, विश्वनाथ कोळी, अजय भगत, वसंतशेठ पाटील, वामन म्हात्रे, हेमंत ठाकूर, उपसरपंच सचिन घरत, हेमंत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या योगीता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, माई भोईर, सुनिता घरत, भाऊ भोईर, काशिनाथ पाटील, प्रकाश प्रकाश देशमुख, किरण देशमुख, शेखर देसमुख, किशोेर पाटील, पी. के. ठाकूर, शेलघर गाव अध्यक्ष अमृत भगत यांच्यासह पदाधीकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

भाजप मध्यवर्ती कार्यालय, पनवेल

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी ध्वजास वंदन करून सलामी दिली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभाला जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, लक्ष्मणशेठ पाटील, पनवेल महापलिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, संजय भगत, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालय

पनवेल : रामप्रहर वृत्त

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात 72वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना साथीच्या रोगामुळे शासनाच्या निर्देशानुसार, जास्त गर्दी होवू न देण्यासाठी या वेळी केवळ महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना प्राचार्या डॉ. शितला गावंड म्हणाल्या की, एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवत असतो आणि देशाचे भविष्य घडविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाची असते आणि त्यामुळे शिक्षकांसाठी निष्ठापूर्वक विद्यादान हे कार्य म्हणजे देशसेवाच आहे. त्यांनी प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर, यांचे तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तसेच कार्यकारणी सदस्य यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की, सध्या आपला देश हा अनेक कसोट्यांमधुन जात आहे आणि सद्यस्थितीत देशाची आर्थिक बाजू बळकट करण्याचे खूप मोठे आव्हान समोर आहे. या कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगात प्रत्येकाने आरोग्याबाबत दिलेल्या सुचनांचे कसोशीने पालन करून, निरोगी राहणे खुप महत्त्वाचे. आपण निरोगी तर आपला देश निरोगी आणि स्वस्थ राहील. या कार्यक्रमात सजावटीची जवाबदारी सहा. प्राध्यापिका रॅव्हनीश बेक्टर आणि अकाऊ टंट पल्लवी खोत यांनी पार पाडली तर सहा. प्राध्यापिका धनश्री चौगुले यांनी देशभक्ती गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहा. प्राध्यापिका कल्पना पोळ यांनी तर आभार प्रदर्शन सहा. प्राध्यापिका संघप्रिया शेरे यांनी केले. या वेळी ग्रंथपाल हितेश छतानी, शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत घरत, संजय दरवडा, प्रमोद कोळी, सचिन पवार, नितीन कोळी, महेश घरत तसेच सीकेटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे अनिल नकटी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. या वेळी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.

भाजप मध्यवर्ती कार्यालय, कामोठे

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्त सुषमा पाटील विद्यालय, आणि साईनगर येथे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते तर कामोठे येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कामोठे शहर अध्यक्ष रवि जोशी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. कामोठे येथील भाजप कार्यालय, सुषमा पाटील विद्यालय आणि साईनगर येथे झालेल्या ध्वजारोहणा वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवि जोशी, मंदार पनवेलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, भाजप महिला मोर्चाच्या वनिता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply