पनवेल : रामप्रहर वृत्त
डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम स्टडीजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यापैकी दोन विद्यार्थिनींनी आपली चुणूक दाखविली.
नवी मुंबईतील हजारो विद्यार्थिनी, तसेच महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होत. यात ‘सीकेटी’च्या 70 विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी सादिका अस्लम मन्सुरी आणि निकिता नितीन भोसले (दोघीही इयत्ता आठवी) यांनी अनुक्रमे 22 व 24व्या क्रमांक मिळविला.
संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …