Breaking News

पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

उरण तहसील कार्यालय

उरण : वार्ताहर

उरण येथील तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 9.15 वाजता उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार नरेश पेढवी, आशा म्हात्रे, स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड, मिलिंद पाडगावकर, नारायण पाटील, अफशा मुकारी, संगिता पवार, सामिया मुकरी, विलास पाटील, तहसील कार्यालय कर्मचारी आदी उपस्थित होते. कोरोना काळात विशेष कामगिरी केलेल्या कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उरण नगरपरिषदेच्या वतीने ठिक-ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये नगरपरिषद कार्यालयासमोर नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते, नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र.3 मोरा येथे नगरसेविका रजनी सुनिल कोळी यांच्या हस्ते, नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा 1 व 2 चे पटांगणात शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती रवी यशवंत भोईर यांच्या  हस्ते, नगरपरिषदेच्या भवरा समाज मंदिरासमोर वैद्यकिय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती नगरसेविका गॅस यास्मीन मुहम्मद फाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, राजेश ठाकूर, मेराज शेख, धनंजय कडवे, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेविका स्नेहल कासारे, जान्हवी पंडीत, तसेच संपूर्णा थळी, जगदीश म्हात्रे, मधुकर भोईर, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.

जासई विद्यालय

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात देशाच्या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांसह शिक्षकांनी ध्वजावंदन केले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे, व्हाईस चेअरमन रामभाऊ घरत, यशवंत घरत, अशोक पाटील, स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, माजी सरपंच व सर्व सदस्य, दहागाव विभागातील सर्व हितचिंतक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, विद्यालयात सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

खारघर, पक्ष कार्यालय

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टी, खारघर-तळोजा मंडल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविधतेत एकता जपणार्‍या आपल्या प्रजासत्ताक देशाची वाटचाल प्रगतीपथावर होण्यासाठी, लोकशाहीचा गाभा असलेल्या संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, संविधातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता यावा, तसेच आपला देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या देशभक्तांनी बलिदान दिले व सध्या जे सीमेवर आपले कर्तव्य बजावून देशाची सेवा करीत आहे त्यांचा गौरव करून हा दिवस साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यात आपली सेवा बजावली असे खारघर शहरातील निवृत्त सेना अधिकारी कर्नल अमरजितसिंग, कमांडर पुरनचंद चौधरी, मोहनसिंग बिस्ट, शिवप्रसाद थपलियाल, नायब सुभेदार कामेश्वर यादव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी भाजप खारघर-तळोजा मंडलातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता वासुदेव पाटील, माजी सभापती अभिमन्यू पाटील, खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग 4 चे अध्यक्ष वासुदेव पाटील, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, भटके विमुक्त आघाडी संयोजक दिलीप आढे, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक नवनीत मारू, कायदा सेल संयोजक, राजेंद्र अगरवाल, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल साबणे, सोशल मीडिया संयोजक अजय माळी,भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन सरचिटणीस अनिल खोपडे, बी. मित्रा, रूपेश चव्हाण, रामचंद्र जाधव, विपुल चौतालिया, सुरेश गायकवाड प्रभाकर बांगर, अक्षय राणे, संजय मुळीक, रामकुमार चौधरी, संतोष शर्मा, विजय उजळंबे, भरत पटेल, कोटियान, सीमा खडसे, भरत कोंढाळकर, संदीप एकबोटे, मुरगण, योगेश कोटारी आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर संपर्क कार्यालय, कळंबोली

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली येथील आमदार प्रशांत ठाकूर संपर्क कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी ध्वजारोहणाला मानवंदन दिली. नगरसेविका प्रमिला रवि पाटील, जगदिश खंडेलवाल, प्रकाश शेलार, शहर मंडल सरचिटणीस संजय दोडके, शहर मंडल उपाध्यक्ष संदीप भगत, मनिषा निकम, दुर्गावती सहानी, प्रियंका पवार, संतोष गायकवाड, अझर शेख, सचिन कांबळे आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहनाचा कार्यक्रम झाला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply