उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा येथील साई माऊली मित्र मंडळाच्या वतीने मोरा कोळीवाडा ते कार्ला (एकविरा) पालखी उत्सव नुकताच झाला. मोरा येथील साईबाबा मंदिर येथे सर्व कोळी बांधवांनी देवीची पूजा केली व पालखीला सुरुवात झाली. पुढे कार्ला (एकविरा) येथे पालखी पोहचल्यानंतर आरती करण्यात आली. या सोहळ्यास साई माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष अक्षय राजेश कोळी, अप्पू कोळी, रोहित कोळी, नीलकंठ कोळी, गणेश कोळी, विनायक कोळी, सिद्धार्थ कोळी व कोळीबांधव मोरा कोळीवाडा ग्रामस्त यांचे सहकार्य मिळाले.