पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील श्री वरदविनायक घरमालक संघटना ई-1, बिल्डींग क्रमांक 1 ते 5मध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशीला घरत यांच्यामार्फत जलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विकासकामाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 12) झाले.
उद्घाटन समारंभास सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे, भाजप नेते सी. सी. भगत, संघटनेचे अध्यक्ष जगदिश घरत, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि रहिवाशी उपस्थित होते.
भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे तसेच त्यांना सोयीसुविधा देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper