Breaking News

रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

पनवेल : वार्ताहर
25वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 5 ते 8 मार्च या कालावधीत पनवेल-नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहेत. स्पर्धा पनवेल महापालिकेने पुरस्कृत केली असून, स्पर्धेसाठी
नवी मुंबई पोलीस, पनवेल व मुंबई महापालिका, सिडको, राष्ट्रीय महामार्ग विभाग, वातावरण फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष, भारत पेट्रोलियम आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सहकार्य लाभत आहे.
या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून तेथील विजेते, रेल्वे, पोलीस, भारतीय सेना दल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय विजेते सहभागी होणार आहेत. यातून चालू वर्षात होणार्‍या जगभरातील सायकलिंग स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या देखरेखीत होणार असून, सोनी स्पिंग क्लब-खारघर (इंटरनॅशनल सायकलिस्ट, भारतीय रेल्वे कोच व निवड समिती सदस्य राजेंद्र सोनी) नियोजन करीत आहे. या स्पर्धेत एक हजार सायकलपटू आपले सर्व कसब व मेहनत या ठिकाणी पणास लावतील, असा अंदाज आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply