Breaking News

श्री अष्टविनायक पतसंस्थेचा कारभार पारदर्शक -विलास चौलकर

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीला तोंड देत असतानाही या वर्षी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने 27 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. पतसंस्था लोकांच्या सेवेसाठीच असून कारभार पारदर्शक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन विलास चौलकर यांनी केले.

येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 20) इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात चौलकर बोलत होते. राजकीय आकस न बाळगता सर्व व्यावसायिकांना येथे कर्ज दिले जाते. संस्थेने इतरांच्या तुलनेत कोणत्याही बँकेकडून एक रुपयाचेही कर्ज घेतलेले नाही, मात्र विश्वासामुळे ठेवी वाढवण्यात आम्ही निश्चितच यशस्वी ठरलो याचा सर्वांना अभिमान आहे. सध्या सोने तारणावर 70 टक्के रक्कम दिली जात असली तरी त्यात आणखी 10 टक्के वाढवून 80 टक्के रक्कम कर्जदारांना देण्यात येणार असल्याचे विलास चौलकर यांनी स्पष्ट केले. सभासद, संचालक, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे संस्था विकासाकडे झेपावत असल्याचे चौलकर यांनी या वेळी सांगितले. सभेला नागोठण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक दीपक कुमार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जैन, पतसंस्थेचे उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सचिव आरती हातनोलकर, संचालक नामदेव चितळकर, जयराम पवार, सुदाम घाग, रतन हेंडे, प्रसाद जोगत, अशोक भंडारे, दिलीप सोनवणे, दिलीप धाडसे, पांडुरंग नागोठणेकर, रोहिदास हातनोलकर, रवींद्र वाजे, संतोष चितळकर, तडजोड समितीचे सखाराम ताडकर, नामदेव नाईक, राजेंद्र गायकर, किशोर नागोठणेकर आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम, विवाहसोहळे, हळदी समारंभात कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक घुटुकडे यांनी केले. आमच्या बँकांपेक्षा पतसंस्थांशी जनतेचा जास्त संबंध येतो. राष्ट्रीयकृत बँकांत कागदपत्रे पाहूनच कर्ज दिले जाते, मात्र पतसंस्थांनी माणसे पाहून कर्ज दिले व हाच आमच्या दोघांमधील फरक असल्याचे बँक ऑफ बडोदाचे दीपक कुमार यांनी सांगितले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून संस्थेशी जवळीक आहे. लहान असली तरी कर्जदारांना दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध होत असल्याने पतसंस्था निश्चितच प्रगतिपथावर असल्याचे गौरवोद्गार सुभाष जैन यांनी काढले. कार्यक्रमात शाहीर अशोक भंडारे, नितीन धाटावकर, पुंडलिक ताडकर, पोयनाड पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल नरेश पाटील, कौस्तुभ दिवेकर, रिया वाजे, ऋषिकेश भोय, अर्णव वादळ यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply