Breaking News

चौकमध्ये शिवरायांना अभिवादन

चौक ः प्रतिनिधी

चौकमध्ये सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते रायगडभूषण प्रशांत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या ओघवत्या शैलीत अफजल खानाचा वध या विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमास विद्या प्रसारिणी सभेचे उपाध्यक्ष अविनाश देशमुख, संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख, योगेन्द्र शहा, मुख्याध्यापक श्री. भोंमले, संस्थेच्या संचालिका तथा प्राथमिक विद्यामंदिर चौकच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, उपमुख्याध्यापिका पुजारी मॅडम, पर्यवेक्षक मोळीक सर तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेच्या विद्यार्थिनी आर्या देशमुख, सिद्धी बांदल, नीती कदम, विधिशा भोपी, आदिती पाटील, रवीना कुमावत तसेच शाळेतील शिक्षिका प्राची जाधव यांनी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बडेकर यांनी केले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply