रसायनी : रामप्रहर वृत्त
छत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन नॅशनल अॅथलेटीक स्पर्धेत आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले आहे. आर्यन हा पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र असून, सध्या रसायनी येथील एचओसीएल कॉलेजमध्ये शिकत आहे.
उंच उडी या क्रीडा प्रकारात आर्यन पाटील याने 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण कामगिरी बजावली. त्याला प्रशिक्षक इंझमाममुल हक खान यांचे मार्गदर्शन लाभले. या देदीप्यमान यशाबद्दल आर्यनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper