अहमदाबाद : वृत्तसंस्था
येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाला. कोहलीने 27 धावांची छोटेखानी खेळी केली, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा पल्ला पार केला.
इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा नवीन विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीने इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना इंग्लंड संघाविरोधात 1910 धावा केल्या होत्या.
कर्णधार असताना इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी 3191 धावा कुटल्या होत्या.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …